advertisement
होम / फोटोगॅलरी / ट्रॅव्हल / Nagpur News: मुलांना दाखवा हा अजब बंगला, नागपुरातील हे ठिकाण पाहिलंय का? PHOTOS

Nagpur News: मुलांना दाखवा हा अजब बंगला, नागपुरातील हे ठिकाण पाहिलंय का? PHOTOS

उन्हाळी सुट्टीत मुलांना आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांची सफर घडवली जाते. नागपुरातील अजब बंगला आवर्जून पाहा.

  • -MIN READ

01
महाराष्ट्रातील सर्वात जुने संग्रहालय अशी ओळख असलेले मध्यवर्ती संग्रहालय हे एक नागपूरातील मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जुने संग्रहालय अशी ओळख असलेले मध्यवर्ती संग्रहालय हे एक नागपूरातील मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे.

advertisement
02
सर रिचर्ड टेम्पल हे मध्य प्रांताचे चीफ कमिशनर असताना सन 1863 मध्ये मध्यवर्ती संग्रहालयाच्या इमारतीचा पाया रचला गेला.

03
ब्रिटिशांच्या काळात अ‍ॅन्टेक्वेरियन सोसायटी ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस या संस्थेच्या गरजेनुसार नागपूर येथे संग्रहालय व ग्रंथालय स्थापन करण्यात आले होते. संग्रहालयाची इमारत बांधून त्याला ‘सेंट्रल म्युझियम नागपूर’ असे नाव देण्यात आले व 7 मे 1863 मध्ये हे संग्रहालय सुरू झाले.

04
मध्य भारतातील सर्वात जुने व अग्रणी संग्रहालय असलेल्या या जुन्या संग्रहालयात भूगर्भ व प्रागैतिहासिक, प्राणी (स्टफ), पक्षी, सरपटणारे प्राणी, शास्त्र, आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, पाषाणशिल्प, शस्त्र, पुरातत्त्व महत्व असलेले शिलालेख, मूर्ती हस्तलिखिते, आदिवासी कला व संस्कृती इत्यादी असंख्य दालनांचा समावेश आहे.

05
वाकाटक काळातील विष्‍णू प्रतिमा, मध्ययुगीन काळातील तेराव्या शतकातील ग्रॅनाईटचे लकशीश, बाराव्या शतकातील ब्रह्मामूर्ती, तसेच मुघलकालीन, राजपुतकालीन शस्त्रे, कौंडण्‍यपूर, माहुरझरी व पवनी येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, दख्‍खन, जयपुरी, उदयपूर, बिकानेर, पहाडी, मराठी शैलीतील पेंटिंग येथे बघायला मिळतात.

06
इ.स. पहिल्या शतकातील पवनीच्या उत्खननात सापडलेले शिलालेखावरील पदवी प्रमाणपत्र, तसेच, लंडनची राणी व्हिक्टोरियाची तरुण आणि वृद्धावस्थेतील भव्य मूर्ती, अशा अनेक वस्तू एकाच छताखाली आपल्याला बघायला मिळतात.

07
विदर्भातील फार पुरातन आणि अतिशय दुर्मिळ ठेवा या संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आला आहे. वर्षाकाठी येथे हजारो पर्यटकांची गर्दी होत असते.

08
या संग्रहालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून क्यूआर कोड स्कान केल्यास प्रत्येक ठिकाणची इत्यंभूत माहिती दृकश्राव्य पद्धतीने मिळत असते.

09
2019 साली कस्तुरचंद पार्क या परिसरात सापडलेल्या ब्रिटिशकालीन तोफा लवकरच या संग्रहालयाच्या परिसरात पर्यटकांना बघता येणार आहे.

10
मध्यवर्ती संग्रहालय आठवड्यातील सोमवार वगळता इतर सर्व दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये पर्यटकांसाठी खुले राहतं.

11
या संग्रहालयातील प्रवेश शुल्क हे 15 वर्ष व त्याखालील पर्यटकांसाठी 5 रुपये आहे. तर 15 वर्षावरील पर्यटकांसाठी 10 रुपये आकारले जातात.

12
शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल असल्यास आणि पूर्व परवानगी घेतली असल्यास विद्यार्थ्यासाठी अवघे 1 रुपया आकारला जातो.

13
नागपूर शहरातील मध्यवर्ती भागात एक महत्त्वाचे ऐतिहासिक, शैक्षणिक व प्रेक्षणीय स्थळ म्हणून फार मोठे महत्त्व या मध्यवर्ती संग्रहालयाला लाभले आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • महाराष्ट्रातील सर्वात जुने संग्रहालय अशी ओळख असलेले मध्यवर्ती संग्रहालय हे एक नागपूरातील मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे.

    MORE
    GALLERIES