जगातील सर्वात लांब क्रूझ टूर 'गंगा विलास' सज्जपर्यटकांच्या स्वागतासाठी आहे. 13 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी याला हिरवा झेंडा दाखवतील. या अलिशान क्रूझचे फोटो पाहून तुम्हालाही प्रवास करण्याचा मोह आवरणार नाही.
गंगा विलास क्रूझ गंगा आणि ब्रह्मपुत्रा या देशातील दोन महान नद्यांवरून प्रवास करणार आहे. वाराणसीहून सुटल्यानंतर ही क्रूझ गाझीपूर, बक्सर आणि पाटणामार्गे कोलकात्याला पोहोचेल.
गंगा विलास बांगलादेशात 15 दिवस राहील आणि नंतर गुवाहाटीहून भारतात दाखल होत दिब्रुगडला पोहोचेल. ही क्रूझ आपल्या प्रवासादरम्यान सुंदरबन डेल्टा आणि काझीरंगासारख्या राष्ट्रीय उद्यानांमधून जाईल. ही क्रूझ एकूण 3200 किमी अंतर पार करेल. हा जगातील सर्वात लांब प्रवास असेल.
यूपी सरकारच्या म्हणण्यानुसार, या क्रूझला 13 जानेवारीला हिरवा झेंडा दाखवला जाईल. वाराणसीच्या रविदास घाटाप्रमाणेच बोर्डिंग पॉईंटवरून याला झेंडा दाखवला जाईल.
या क्रूझमध्ये 80 प्रवाशांसाठी 18 सुट्स आहेत. हा प्रवास 50 दिवसांचा असून यामध्ये 50 पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. त्यात हेरिटेज स्थळांचाही समावेश आहे.
अंतरा लक्झरी रिव्हर क्रूझ आणि जेएम बक्षी रिव्हर क्रूझ खाजगी कंपन्या सरकारच्या सहकार्याने या नदी क्रूझचे संचालन करतील.
विशेष म्हणजे लोक या रिव्हर क्रूझची आतुरतेने वाट पाहत आहेत. याबाबत लोक मोदी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत. या क्रूझमुळे देशातील पर्यटनाला तर चालना मिळेलच, पण जगाच्या पर्यटन नकाशावरही ते चमकेल, असे लोकांचे म्हणणे आहे. या प्रवासामुळे भारताचा नकाशा बदलेल असे लोकांचे म्हणणे आहे. त्यात लोक मोठ्या प्रमाणात फिरतील आणि त्यामुळे रोजगारही निर्माण होईल.