वेळ वाचवण्यासाठी लोक विमानानं प्रवास करतात. विमानात प्रवास करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. विमानात काही गोष्टी नेणं कायद्यानं गुन्हा आहे. अशा गोष्टी तुमच्या सामानात आढळल्यास तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. अमली किंवा नशेचे पदार्थ विमानात नेण्यास सक्त मनाई आहे. सिगारेट, तंबाखू, गांजा, हेरॉइन असे पदार्थ तुमच्याकडे आढळल्यास तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. रेजर, ब्लेड, अशा धारदार गोष्टी विमानात घेऊन जाऊ नये. बंदूक, चाकू किंवी अन्य प्रकारची शस्त्रं विमान नेऊ नका.