advertisement
होम / फोटोगॅलरी / ट्रॅव्हल / 3 वर्षांची अन्वी पोहोचली तब्बल 1646 मीटर उंचीवर, महाराष्ट्रातलं सर्वात उंच आहे शिखर PHOTOS

3 वर्षांची अन्वी पोहोचली तब्बल 1646 मीटर उंचीवर, महाराष्ट्रातलं सर्वात उंच आहे शिखर PHOTOS

कोल्हापुरातील 3 वर्षांच्या जागतिक विक्रमवीर अन्वी घाटगे हिनं कळसुबाई शिखराला दुसऱ्यांदा गवसणी घातली आहे.

  • -MIN READ

01
 सुकन्या फक्त 3 वर्षांची जागतिक विक्रमवीर अन्वी चेतन घाटगे हिने नुकतेच कळसुबाई शिखर दुसऱ्यांदा सर केले आहे. समुद्रसपाटीपासून 1646 मीटर उंचीवर असलेले हे कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.

कोल्हापूरची सुकन्या फक्त 3 वर्षांची जागतिक विक्रमवीर अन्वी चेतन घाटगे हिने नुकतेच कळसुबाई शिखर दुसऱ्यांदा सर केले आहे. समुद्रसपाटीपासून 1646 मीटर उंचीवर असलेले हे कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.

advertisement
02
मूळची हातकणंगले तालुक्यातील नेज येथील असणारी अन्वी चेतन घाटगे ही फक्त 3 वर्षे 11 महिन्यांची गिर्यारोहक आहे. गतवर्षी 1 जुलै 2022 रोजी अन्वीने फक्त 2 वर्षे 11 महिन्यांची असताना पहिल्यांदा कळसुबाई शिखर सर केले होते.

03
तिच्या या असाधारण कामगिरीची नोंद इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड् आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड् मध्ये झाली आहे. तसेच वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीने देखील तिला 'यंगेस्ट माऊंटेनियर' हा किताब दिलेला आहे.

04
01 जुलै 2023 रोजी अन्वीने तिची आई अनिता, वडील चेतन आणि प्रा. अनिल मगर यांच्यासह दु. 01.30 च्या सुमारास कळसुबाई सर करण्यास सुरवात केली. मुसळधार पाऊस, दाट धुके, तसेच प्रंचड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याशी सामना करत साधारणपणे सायं. 04.30 वाजता ती शिखरावर पोहचली.

05
02 जुलै 2023 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पश्चिम घाटातील रतनगड (समुद्रसपाटीपासून 4300 फूट) हा चढाईस अत्यंत कठीण गड अन्वीने सर केला. रतनगड हा मुसळधार पावसात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, फसव्या व निसरड्या झालेल्या वाटेवरुन आणि वेगाने वाहणारे आठ ते दहा ओढे पार करत, घनदाट जंगलातून अन्वीने ही मोहीम पूर्ण केली आहे.

06
केवळ 3 वर्षे 11 महिन्यांच्या वयामध्ये रतनगड सर करणारी अन्वी सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे. त्याबाबत नेचर हंट ॲडव्हेन्चर संस्थेचे अध्यक्ष रवी झाडे यांनी तसे प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान केला आहे. तसेच सलग दोन दिवसात कळसुबाई शिखर व रतनगड सर करणारीही अन्वी सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे.

07
दरम्यान मे 2023 मध्ये अन्वीने कोकणातील 10 गडकिल्ले आपल्या आईच्या मदतीने फक्त 3 दिवसांत सर केले होते.

08
तसेच आतापर्यंत अन्वीने दक्षिण भारतातील 7 किल्ल्यांसह महाराष्ट्रातील एकूण 38 किल्ले सर केले. तसेच या किल्ल्यांवर स्वच्छता मोहिमा केलेल्या आहेत.

09
त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील सर्वात उंच शिखर मुल्यणगिरी यासह सर्वात कमी वयात तीन शिखर सर करण्याचा जागतिक विक्रम अन्वीच्या नावावर याआधी झालेला आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  <a href="https://lokmat.news18.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरची </a>सुकन्या फक्त 3 वर्षांची जागतिक विक्रमवीर अन्वी चेतन घाटगे हिने नुकतेच कळसुबाई शिखर दुसऱ्यांदा सर केले आहे. समुद्रसपाटीपासून 1646 मीटर उंचीवर असलेले हे कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.

    MORE
    GALLERIES