काही लोक असे आहेत, ज्यांना फिरण्याची इतकी आवड असते की ते त्यासाठी कितीही पैसे खर्च करू शकतात. पण तुम्हाला फ्रीमध्ये फिरायला मिळालं तर? हे कसं शक्य आहे असं तुम्ही म्हणाल.
2/ 9
तुम्हाला आश्चर्य वाटेल एक कपल असंच फ्रीमध्ये फिरतं. गेल्या 6 वर्षांत या कपलने तब्बल 84 देशांची सफर केली आहे. तेसुद्धा फार पैसे खर्च न करता.
3/ 9
यूकेत राहत असलेलं लिजी सीअर आणि अलुन वेस्टोल हे कपल, या कपलने असं काही केलं आहे की ते जिथं जातात तिथं त्यांना काहीच पैसे खर्च करावे लागत नाहीत.
4/ 9
लिजीने क्यू कोम एक्सचेंजची सदस्यता घेतली आहे. लिजीने सांगितलं की क्यु होम एक्सचेंजची वार्षिक फी 175 डॉलरपासून सुरू होते. ही कंपनी संपूर्ण जगभरात पर्यटकांना होम एक्सचेंजचा एक अनोखा असा पर्याय उपलब्ध करून देतं.
5/ 9
जसं तुम्ही मुंबईत राहणारे असून गोव्याला जाणारे असाल आणि गोव्याहून एखादी व्यक्ती मुंबईला येत असेल. तर तुम्ही गोव्यातील ती व्यक्ती मुंबईतील तुमच्या आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या गोव्यातील घरी राहू शकता.
6/ 9
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार सीयरने सांगितलं की, तिने आतापर्यंत इटली, स्पेन, फिनलँड, हंगेरी, जर्मनीत प्रवास केला आहे. त्या बदल्यात सहा वर्षांत 48 कुटुंब तिच्या वेस्ट लंडनमधील घरी राहिले.
7/ 9
उपाशी पोटी काय खाणे टाळावे
8/ 9
लिजी म्हणाली, नुकतीच ती दोन आठवड्यांसाठी फिरायला गेली होती. तिथं तिला 2 बीएचकेच्या व्हिलामध्ये राहायला मिळालं. तिथं एक खासगी स्विमिंग पूलही होता. सोबत हाऊसकिप जो सकाळी नाश्ता घेऊन आला. या प्रवासासाठी मला फक्त 400 पाऊंडचा खर्च आला.
9/ 9
या कपलला फक्त विमान प्रवासासाठी पैसे मोजावे लागले, बाकी त्यांना काहीच खर्च करावा लागला नाही. लिजी म्हणाली, ती शक्यतो पर्यटनस्थळांचा प्रवास करते. कित्येक वेळा ती आपला जॉबही बदलते आणि कित्येक महिने तिथं राहते.