या सवलतींमध्ये बँक ऑफर तसेच एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. सर्व ऑफर्सनंतर, ग्राहकांना फक्त 34,490 रुपयांमध्ये iPhone 13 Mini घरी आणता येईल. 128 GB iPhone 13 Mini ची किंमत ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर 64,990 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आली आहे. यावर 9,910 रुपयांची सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर, iPhone 13 Mini 128 GB व्हेरिएंटची किंमत 54,990 रुपये होईल.
iPhone 13 Mini मध्ये मोठ्या अपर्चरसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये f/1.8 अपर्चरसह 12-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/1.8 अपर्चरसह 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. अल्ट्रा-वाइड लेन्समध्ये ऑटोफोकस आहे. सेल्फीसाठी या फोनच्या छोट्या नॉचमध्ये f/2.2 अपर्चरसह 12-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.