WABetaInfo च्या अहवालात असं म्हटलं आहे की ही बीटा वर्जन असल्यानं, असंही होऊ शकतं की काही वैशिष्ट्ये अद्याप उपलब्ध नाहीत. उदाहरणार्थ, ते लाइव्ह लोकेशन, ब्रॉडकास्ट लिस्ट आणि स्टिकर्स पाहू शकणार नाहीत. परंतु तुम्ही एकाच वेळी 4 पर्यंत डिव्हाइस लिंक करू शकता जेणेकरून तुम्ही तुमच्या WhatsApp खात्याशी दोनपेक्षा जास्त मोबाईल फोन देखील लिंक करू शकता.