यूजर्स आता ट्विटरवरूनही बक्कळ पैसा कमावणार? इलॉन मस्क काय म्हणाले..
सोशल मीडिया कंपन्या लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि क्रिएटर्सला पैसे कमावण्यासाठी अनेक बदल करत राहतात. सध्या लोक YouTube आणि Instagram सारख्या प्लॅटफॉर्मवरून पैसे कमवू शकतात. आता ट्विटरवरही असे होऊ शकते.
नवीन ब्लू फीचरच्या मदतीने एका यूजरने एक लांबलचक ट्विट केले होते. या फीचरद्वारे तुम्ही 4,000 अक्षरांचे ट्विट तयार करू शकता. यावर प्रत्युत्तर देताना मस्क म्हणाले की, हा दीर्घ ट्विटचा चांगला उपयोग आहे.
2/ 5
यासोबतच मस्कने असेही सांगितले की, पुढील अपडेटमध्ये बेसिक फॉरमॅटिंगसह खूप लांब ट्विटला परवानगी दिली जाईल. जेणेकरून तुम्ही ट्विटरवर कोणत्याही प्रकारचा मजकूर पोस्ट करू शकता.
3/ 5
याशिवाय, आम्ही सबस्क्रिप्शनमध्ये देखील बदल करत आहोत जेणेकरुन तुम्ही लोकांना काही सामग्रीसाठी शुल्क आकारू शकता आणि वापरकर्ते एका क्लिकवर पैसे देखील देऊ शकतात. मस्कच्या या पोस्टवर अनेक यूजर्सनी आपले मतही व्यक्त केले होते.
4/ 5
एका युजरने लिहिले, 'ट्विट्स वाचण्यासाठी शुल्क आकाराल का?'. तसेच एकाने लिहिले की कल्पना चांगली आहे. अशा परिस्थितीत आता लेखक संपूर्ण पुस्तक ट्विटरवर प्रकाशित करू शकणार आहे. एका ट्विटमध्ये एक अध्याय ठेवला जाईल आणि पहिले ट्विट विनामूल्य असेल.
5/ 5
मायक्रोब्लॉगिंग साइटवर अशी सुविधा लवकरच आली तर निर्मात्यांसाठी त्यांच्या फॉलोअर्सकडून पैसे मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग बनू शकतो. ब्लू सेवा भारतात लॉन्च करण्यात आली असून त्याची किंमत Android आणि iOS साठी 900 रुपये आणि वेबसाठी 650 रुपये ठेवण्यात आली आहे.