Samsung Galaxy F12 कमी किमतीत, स्वस्तात खरेदीची संधी आहे. सर्व ऑफर्स लागू झाल्यास हा फोन केवळ 74 रुपयांत खरेदी करता येईल.
Samsung Galaxy F12 स्मार्टफोनच्या 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे. परंतु हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये 9499 रुपयांत उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट मिळतो आहे.
Flipkart Big Saving Days मध्ये Samsung Galaxy F12 फोन खरेदी करताना अॅक्सिस बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 475 रुपये डिस्काउंट मिळेल. त्यामुळे फोनची किंमत 9024 रुपये होईल. त्याशिवाय एक्चचेंज ऑफरही आहे.
Samsung Galaxy F12 वर 8950 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळते आहे. जर तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर इतकी सूट मिळू शकते.
परंतु 8950 रुपयांची ही संपूर्ण ऑफर जर फोन चांगल्या कंडिशनमध्ये असेल, फोनचं मॉडेल लेटेस्ट असेल तरच मिळेल.
8950 रुपयांची संपूर्ण ऑफर मिळाल्यास फोनची किंमत 74 रुपये होईल. म्हणजेच 12499 रुपयांचा फोन 74 रुपयांत खरेदी करता येईल.