Jio 399 पोस्टपेड प्लॅन - जिओच्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये एक महिन्यापर्यंत 75GB डेटा मिळतो. यात दिवसाला कोणतंही लिमिट नाही. संपूर्ण महिन्यात इतक्या डेटाचा वापर करता येईल.
जर संपूर्ण डेटा संपला नाही, तर जिओ या प्लॅनमध्ये 200GB पर्यंतचा डेटा रोलओवरची सुविधा देतं. डेटा संपला तर कंपनी 1GB डेटासाठी 10 रुपये चार्ज करेल.
या प्लॅनसह नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) आणि डिज्नी + हॉटस्टारचं (Disney+ Hotstar) फ्री सब्सक्रिप्शन मिळतं आहे. त्याशिवाय Jio Apps चंही फ्री सब्सक्रिप्शन दिलं जात आहे.
Jio 479 रुपये प्रीपेड प्लॅन - जिओचा 479 रुपयांचाही प्रीपेड प्लॅन आहे. याची वॅलिडिटी 56 दिवसांची आहे.
यात दररोज 1.5GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जातात. तसंच Jio Apps चं फ्री सब्सक्रिप्शनही मिळतं.