4G आणि 5G नेटवर्कमध्ये ऑपरेट करणाऱ्या रिलायन्स जिओने भारतातील सर्वात स्वस्त किंमतीचा 4G मोबाईल फोन लाँच केला आहे. ज्याची किंमत फक्त 999 इतकी ठेवण्यात आली आहे.
28 दिवसांच्या प्लॅनसाठी ग्राहकांना केवळ 123 रुपये मोजावे लागणार असून यामध्ये ग्राहकांना कंपनीकडून 14 GB 4G डेटा देण्यात येईल.
या मोबाईल फोनच्या माध्यमातून भारतातील तब्बल 25 कोटी 2G फोन ग्राहकांच्या हातात 'जिओ भारत V2' फोन यावा यासाठी रिलायन्स जिओ प्रयत्न करणार आहे.