गुगलनं काढून टाकलं फीचर - गुगलनं गेल्या वर्षी सर्व अँड्रॉईड फोनमधून कॉल रेकॉर्डिंग फीचर काढून टाकलं होतं. म्हणजेच तुमच्या फोनमध्ये गुगल डायलर असेल, तर तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय मिळणार नाही. पण त्यानंतरही बऱ्याच जणांना कॉल रेकॉर्डिंग करणं शक्य आहे. कारण त्यांच्या फोनमध्ये गुगल डायलर नाही, किंवा ते कॉल रेकॉर्डिंगसाठी वेगळं अॅप वापरतात.
मेसेज प्ले होईल गुगलनं कॉल रेकॉर्डिंगबाबत माहिती मिळावी, यासाठी एक मेसेज देण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच, जर तुम्ही अँड्रॉईड युजर असाल, तर कॉल रेकॉर्ड करताना तुमच्या फोनमध्ये एक मेसेज प्ले होईल. युजरनं तुमचा कॉल रेकॉर्ड करताच, तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगबाबतचा मेसेज ऐकू येईल. हा डीफॉल्ट मेसेज आहे.