फ्लिपकार्ट दसरा सेल 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 'शॉपिंग का बडा धमाका' अशी या सेलची टॅगलाइन आहे. सेलमध्ये ग्राहक परवडणाऱ्या किमतीत होम गॅजेट्स, होम अप्लायन्सेस, अॅक्सेसरीज आणू शकतात. सेलमध्ये स्मार्ट टीव्ही आणि उपकरणांवर 75 टक्के सूट दिली जाईल. सेलमध्ये ग्राहक 17,249 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत 4K अल्ट्रा HD टीव्ही घरी आणू शकतात.
Vu Premium (43-इंच) अल्ट्रा एचडी (4K) एलईडी स्मार्ट टीव्ही 1 वर्षाच्या वॉरंटीसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना या टीव्हीवर 44 टक्के सूट मिळू शकते. डिस्काउंटनंतर हा टीव्ही 45,000 रुपयांऐवजी केवळ 25,001 रुपयांमध्ये घरी आणता येईल.
iFFALCON 43 इंच अल्ट्रा HD 4K LED स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीवर ग्राहकांना 58 टक्क्यांची सूट मिळू शकते. डिस्काउंटनंतर हा टीव्ही 47,990 रुपयांऐवजी फक्त 19,999 रुपयांमध्ये घरी आणता येईल. हा स्मार्टटिव्ही अल्ट्रा एचडी (4K) 3840x2160 पिक्सेल रिझोल्यूशन डिस्प्लेसह येते. ग्राहकांना 11,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.
Kodak 7X Pro (43 इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट Android TV 41 टक्क्यांच्या सवलतीत उपलब्ध करून दिला जात आहे. ग्राहक हा 40W साउंड टीव्ही 33,999 रुपयांऐवजी केवळ 19,999 रुपयांना खरेदी करू शकतात. या टीव्हीवर ग्राहकांना 11,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही मिळू शकते.
MarQ (43-इंच) Ultra-HD (4K) LED स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही 45 टक्के सवलतीत सेलमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. ग्राहक हा टीव्ही सेलमधून 34,999 रुपयांऐवजी केवळ 18,999 रुपयांमध्ये घरी आणू शकतात. यावर ग्राहकांना 11,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जाईल.