अभिनेते रजनीकांत यांच्या 'रोबोट' चित्रपटात कृत्रिम रोबोटने मानवावर हल्ला केल्याचं तुम्हा पाहिलं असेल. अशीच एक घटना सत्यात झाल्याचं बोललं जात आहे. वास्तविक, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला दिसत आहे. व्हिडिओचे कॅप्शन असे आहे की AI रोबोटने 29 शास्त्रज्ञांना मारले. काही पोस्टमध्ये ही घटना जपानमधील आहे तर काहींमध्ये ती दक्षिण कोरियाची असल्याचे म्हटले आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या फॅक्ट चेकिंगमध्ये व्हिडीओ बनावट असल्याचे आढळून आले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, व्हिडिओतील महिला लिंडा मौल्टन हॉवे आहे. ते युफोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी एलियनबद्दल काही पुस्तके लिहिली आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेब्रुवारी 2018 चा आहे. जिथे ती लॉस एंजेलिसमध्ये एका कार्यक्रमात होती.