ट्विटरवर एका युजरने इलॉन मस्कला व्हर्च्युअल जेल बनवण्याचा सल्ला दिला आहे. जर कोणत्याही युजर्सने कंपनीची पॉलिसी किंवा नियम तोडले, तर त्या लोकांच्या प्रोफाईलवर जेल आयकॉन येईल आणि ते ट्विटरच्या व्हर्च्युअल जेलमध्ये गेल्यानंतर ट्विट करू शकणार नाहीत, तसेच इतर कोणत्याही ट्विटवर लाईक किंवा कमेंट करू शकणार नाहीत.