केंद्रीय नागरीउड्डाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.ड्रोनचा वापर करायचा असेल तर या नियमांची माहिती हवी आणि त्याप्रमाणे नोंदणी करायला हवी. नाहीतर कारवाई होऊ शकते.
या नियमांनुसार, ड्रोनचं 5 प्रकारांत वर्गीकरण करण्यात आलंय. त्यानुसार वजन पाहून ड्रोन खरेदीचा निर्णय घ्या.
नॅनो सोडून इतर ड्रोन उडवण्यासाठी डीजीसीएची (Director General of Civil Aviation) परवानगी आवश्यक असते.
विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, संवेदनशील ठिकाणांपासून ठराविक अंतरावर ड्रोन उडवू शकता. अनेक संवेदनशील ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यास बंदी आहे.