उशिरा का होईन पण राज्यात मान्सून दाखल झाला आहे. अनेक शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत सॅटेलाइट टीव्ही वापरणाऱ्यांचे सिग्नल अचानक गायब होतात. अशावेळी घरात बसून काय करावं कळत नाही. तुम्हालाही तुमच्या घरात अशी समस्या भेडसावत असेल, तर सिग्नल ठीक करण्यासाठी काही टिप्स वापरू शकता.
पावसाचा सॅटेलाइट सिग्नलवर कसा परिणाम होतो? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वादळ आणि पावसामुळे, उपग्रहाकडून प्राप्त होणारे सिग्नल कमकुवत होतात. कारण विद्युत चुंबकीय लहरी पाऊस आणि वादळांमुळे विचलित होतात. यामुळे तुमच्या टीव्हीचा सिग्नल गायब होतो.
बहुतेक सॅटेलाइट टीव्ही Ku-band सिग्नलवर काम करतात. केयू-बँड सिग्नलचे बँड सिग्नलच्या खाली येतात, जे पावसामुळे विचलित होतात, त्यामुळे हवामानातील अचानक बदल केयू-बँड सिग्नल देखील विचलित करतात.
सॅटेलाइट सिग्नल ठीक करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचा डिश अँटेना पाणी साचलेल्या ठिकाणाहून काढून कोरड्या जागी इन्स्टॉल करणे.
सॅटेलाइट डिशवर नॉनस्टिक कुकिंग स्प्रेची फवारणी करा. हे पावसाचे थेंब डिशवर थांबण्यापासून प्रतिबंधित करते. तुमच्या भागात किती वेळा पाऊस पडतो. त्यानुसार दर तीन महिन्यांनी किमान एकदा डिशवर स्प्रे फवारण्याची आवश्यकता आहे.
जर डिश घराच्या बाजूला भिंतीवर लावली असेल, तर तुम्ही डिशच्या समोर फायबरग्लासचा तुकडा लावू शकता. फायबरग्लास डिशसाठी ढाल म्हणून काम करेल आणि पाणी डिशच्या सिग्नलला विचलित करणार नाही.
तुम्ही डिश उंच खांबावर बसवल्यास, जोरदार पाऊस आणि वारा तिची सेटिंग खराब करू शकतात. अशा परिस्थितीत, ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी टेक्नीशियनला बोलवावे लागेल. त्यामुळे डिश इन्स्टॉल करताना ही गोष्ट लक्षात ठेवा.