काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की ब्लू टिक संदर्भात मेटाकडून काही मोठी घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी नुकतीच मेटा व्हेरिफाईडची घोषणा केली. यासह, कोणताही वापरकर्ता सरकारी आयडी देऊन त्याचे खाते व्हेरिफाईड करण्यास सक्षम असेल.
वापरकर्त्यांना वेब आणि iOS मध्ये व्हेरिफिकेशनसाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील. झुकरबर्गने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वेबसाठी प्रत्येक महिन्याला $11.99 म्हणजेच सुमारे 1,000 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे, iOS वापरकर्त्यांना $14.99 म्हणजेच 1,200 रुपये अधिक द्यावे लागतील.
या आठवड्यात ही सेवा सुरू होणार आहे. झुकरबर्गच्या मते, ही सबस्क्रिप्शन सेवा आहे. याला निळा बॅज मिळेल. तसेच, पूर्वीपेक्षा चांगली सुरक्षा उपलब्ध होईल. कस्टमर सपोर्टसाठी थेट प्रवेश देखील उपलब्ध असेल. सुरुवातीला हे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये लॉन्च केले जात आहे. लवकरच इतर देशांमध्येही त्याचा विस्तार केला जाईल.
या नवीन सबस्क्रिप्शनमुळे युजर्सना इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोन्हीवर ब्लू बॅज मिळू शकेल. आतापर्यंत ते राजकारणी, अभिनेते, पत्रकार किंवा सरकारी अधिकारी यासारख्या लोकप्रिय किंवा प्रसिद्ध व्यक्तींनाच दिले जात होते.