advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Cricket : आयपीएल गाजवणारे युवा फलंदाज टेस्ट क्रिकेटमध्ये घेणार चेतेश्वर पुजाराची जागा?

Cricket : आयपीएल गाजवणारे युवा फलंदाज टेस्ट क्रिकेटमध्ये घेणार चेतेश्वर पुजाराची जागा?

टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराला टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात सामील करून घेण्यात आलेले नाही. कामगिरीत सातत्य नसल्यामुळे पुजाराला टीममधून वगळण्यात आल्याचं सांगितलं जात असून आता त्याच्या क्रिकेट करिअरवर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर चेतेश्वर पुजाऱ्याच्या जागी कोणता खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येणार याविषयी अनेक अंदाज बांधले जात आहेत.

01
12 जुलै पासून टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. यादौऱ्यात वेस्ट इंडिजच्या संघासोबत टीम इंडिया टेस्ट, वनडे आणि टी 20 क्रिकेट सामने खेळणार असून 12 जुलै पासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात टेस्ट क्रिकेट खेळले जाणार आहे.

02
WTC फायनलमधील अपयशानंतर चेतेश्वर पुजाराला टीम इंडियाच्या टेस्ट टीममधून वगळण्यात आले होते. पुजारा ऐवजी आयपीएलचे मैदान गाजवणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांना टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे.

03
परंतु जो कोणी खेळाडू टीम इंडियात चेतेश्वर पुजाऱ्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल त्याच्या समोर अनेक आव्हान असणार आहेत.कारण गेल्या 3 दशकात भारतीय क्रिकेटला असे 2 फलंदाज मिळाले, जे टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर भिंत म्हणून उभे राहिले. खडतर आव्हानांमध्ये उभा दोन्ही फलंदाजांनी टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली होती. यातील एक खेळाडू म्हणजे राहुल द्रविड आणि दुसरा म्हणजे चेतेश्वर पुजारा. टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर पुजारा-द्रविड यशस्वी ठरले. या दोघांनी 267 कसोटी सामने खेळळे आणि एकूण 20 हजारांहून अधिक धावा आणि 55 शतके ठोकली.

04
चेतेश्वर पुजारा ऐवजी टीम इंडियाच्या टेस्ट संघात तिसऱ्या क्रमांकावर युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल किंवा ऋतुराज गायकवाड या दोघांना संधी दिली जाऊ शकते.

05
आयपीएल 2023 मध्ये यशस्वी जयस्वालने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना शतकीय कामगिरी केली. तसेच त्याने अवघ्या 13 बॉलमध्ये अर्धशतक ठोकून के एल राहुलचा आयपीएलमधील विक्रम मोडला. यशस्वीने कमी कालावधीत त्याच्या बॅटिंगने सर्वांना प्रभावित केले आहे.

06
ऋतुराज गायकवाडने देखील आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्ससाठी चांगली कामगिरी केली. त्याने फलंदाजी करताना १६ सामन्यात एकूण ५९० धावा केल्या. यादरम्यान 4 अर्धशतक देखील ठोकली आहेत.

07
टीम इंडियाचा टेस्ट संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल,ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर. , अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

  • FIRST PUBLISHED :
  • 12 जुलै पासून टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. यादौऱ्यात वेस्ट इंडिजच्या संघासोबत टीम इंडिया टेस्ट, वनडे आणि टी 20 क्रिकेट सामने खेळणार असून 12 जुलै पासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात टेस्ट क्रिकेट खेळले जाणार आहे.

    MORE
    GALLERIES