WPL 2023 : आवाज कुणाचा? या खेळाडूंनी गाजवला महिला आयपीएलचा पहिला हंगाम
भारतात सुरु असलेली महिला प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा आता अंतिम सामन्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रविवारी 26 मार्च रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यासंघांमध्ये पारपडणार आहे. या सामन्यात कोणता संघ विजयी होऊन महिला आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरेल याची सर्वांनाच उत्सुकतता आहे. तेव्हा महिला आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये कोणत्या खेळाडूचा दबदबा राहिला त्यांच्या विषयी जाणून घेऊयात.
महिला आयपीएलच्या टॉप स्कोररच्या लिस्टमध्ये दिल्ली कॅपिटलच्या मेग लॅनिंग प्रथम क्रमांकावर आहे. मेग लॅनिंगने 8 सामन्यांमध्ये 310 धावा केल्या आहेत.
2/ 6
फलंदाजीत टॉप स्कोर करणाऱ्या लिस्टमध्ये यूपी वॉरियर्सची ताहलिया मॅकग्रा ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने 9 सामन्यांमध्ये 302 धावा केल्या आहेत.
3/ 6
मुंबई इंडियन्सची नॅट सायव्हर-ब्रंट ही या लिस्ट मध्ये तिसऱ्या स्थानावर असून तिने 9 सामन्यात 272 धावा केल्या आहेत.
4/ 6
फलंदाजासोबतच महिला आयपीएलमध्ये गोलंदाजांचाही दबदबा राहिला. यूपी वॉरियर्सची गोलंदाज सोफी एक्लेस्टोन हिने 9 सामन्यांमध्ये सर्वाधिक 16 विकेट घेतल्या आहेत.
5/ 6
सोफीच्या खालोखाल मुंबई इंडियन्सच्या सायका इशाक ही 9 सामन्यांनमध्ये 15 विकेट्स घेऊन दुसऱ्या स्थानी आहे.
6/ 6
मुंबई इंडियन्सची हेली मॅथ्यूज ही सर्वाधिक विकेट घेणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असून तिने 9 सामन्यांमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत.