महिला आयपीएलमधील अंतिम सामना जिंकून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विजेत्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
महिला आयपीएलचा अंतिम सामना मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला.
प्रथम फलंदाजी करून दिल्लीने मुंबईला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान मुंबईने 7 विकेट्स आणि 3 चेंडू राखून पूर्ण केले.
मुंबई इंडियन्सने महिला आयपीएलचे विजेतेपद पटकावले असून त्यांना 6 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तर उपविजेत्या ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला 3 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले.