महिला प्रीमिअर क्रिकेट लीगला सुरुवात झाली आहे. मुंबई येथे ही लिलाव प्रक्रिया पारपडत असून या लिलावाला अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे.
मुंबईत सुरु असलेल्या या लिलावात तब्बल 409 महिला खेळाडूंचा सहभाग असून महिला प्रीमियर लीगचा पहिलाच लिलाव असल्याने याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.
बीसीसीआयचे पदाधिकारी या लिलावात उपस्थित असून यात भाजप आमदार आशिष शेलार, मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानी यांचाही समावेश आहे.