विराट कोहली जेव्हा लॅमलाईटमध्ये आला तेव्हा त्याचे नाव सर्वप्रथम अभिनेत्री सारा जेन डायस हिच्याशी जोडले गेले होते. २००७ मध्ये साराने फेमिना मिस इंडिया ही स्पर्धा जिंकली होती. विराट कोहलीचा तेव्हा नुकताच टीम इंडियात प्रवेश झाला होता. यावेळी विराट आणि साराच्या एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
रिपोर्ट्स नुसार विराट कोहली आणि इझाबेल लिट हे दोघे २०१२ ते २०१४ दरम्यान एकमेकांना डेट करत होते. विराट कोहलीशी ब्रेकअप झाल्यानंतर इझाबेल लिट ने त्यांच्या नात्याबद्दल एका मुलाखतीत खुलेआमपणे बोलली होती. ती म्हणाली, की विराट आणि मी दोन वर्ष रिलेशनशिप मध्ये होतो, पण काही कारणामुळे आमच्यात ब्रेकअप झाले".