टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा भारताचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराची वर्षाची कमाई 200 कोटी रुपये आहे. भारतातलाच नाही तर विराट जगातला सगळ्यात श्रीमंत क्रिकेटपटूही आहे. पण तुम्हाला या खेळाडूविषयी माहिती आहे का, जो फक्त एकाच मॅचमधून विराटच्या वर्षाच्या कमाईपेक्षा 543 कोटी रुपये जास्त कमावतो.
अमेरिकेचा महान प्रोफेशनल बॉक्सर फ्लॉयड मेवेदर (Floyd Mayweather) याने खुलासा केला आहे की, त्याने मागच्या महिन्यात युट्यूबर लॉगन पॉलसोबत झालेल्या फाईटमधून 100 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. म्हणजेच त्याने एकाच सामन्यातून तब्बल 742 कोटी रुपये कमावले.
मेवेदर आणि लॉगनमध्ये झालेली ही फाईट नकली होती. स्वत: अमेरिकन बॉक्सर मेवेदरने याबाबतचा खुलासा केला आहे. मेवेदरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपण नकली मॅच खेळून 100 मिलियन डॉलर कमावल्याचे सांगतिलं.
मेवेदर आणि लॉगन पॉल यांच्यात 6 जूनला हा मुकाबला झाला होता. ही मॅच 8 राऊंडपर्यंत चालली. मेवेदरला युट्यूबर लॉगन पॉलला नॉक आऊटही करता आलं नव्हतं. यानंतर संपूर्ण जगभरात मेवेदरवर टीका झाली होती. या टीकेने आपल्याला काहीही फरक पडत नाही, कारण या फाईटमधून आपल्याला 742 कोटी रुपये मिळाल्याचं मेवेदर म्हणाला.
मेवेदरने त्याच्या बॉक्सिंग करियरमध्ये एकही मॅच गमावलेली नाही. 2017 साली त्याने निवृत्ती घेतली होती. आपल्या करियरमध्ये त्याने सगळ्या 50 मॅच जिंकल्या होत्या.
मेवेदरने 2020 पर्यंत 450 मिलियन डॉलर कमावले होते, पण यावर्षी मे महिन्यात त्याने दावा केला की, आपण करियरमध्ये 1.2 बिलियन डॉलर म्हणजेच 89.13 अरब रुपयांची कमाई केली.
मेवेदर अनेक आलीशान गाड्यांचा मालक आहे. त्याच्याकडे बुगाटी ग्रॅण्ड स्पोर्ट, बुगाटी वेरॉन, लॅम्बॉर्गिनी एवेंटेडॉर, फेरारी 599 जीटीबी फियोरानो यांच्यासारख्या गाड्या आहेत. याशिवाय त्याच्याकडे अनेक रोल्स रॉयस आणि बेंटलेही आहेत.