आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी शानदार गोलंदाजी करणाऱ्या तुषार देशपांडेचा नुकताच साखरपुडा पार पडला. तुषारचा नभा गडमवार हिच्यासोबत साखरपुडा पार पडला. नभा ही तुषारची बालपणीची मैत्रीण आहे. तुषारला शाळेच्या दिवसांपासूनच नभा आवडायची. तुषारने साखरपुडा पार पडताच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तुषार आणि नभाच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.