भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात १८ जानेवारी रोजी सामना खेळवला जाणार आहे. ज्युनियर एनटीआरने अलीकडेच त्याच्या मूळ गावी हैदराबादमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या काही खेळाडूंची भेट घेतली. ज्युनियर एनटीआर काल रात्री टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंसोबत हँग आउट करताना दिसला. टीम इंडियाचे खेळाडू युजवेंद्र चहल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि शार्दुल ठाकूर हे लोकप्रिय चित्रपट कलाकारांना भेटले होते.
आपल्या कामगिरीने आजकाल क्रिकेटच्या चर्चेत राहिलेला सूर्य कुमार यादव आणि त्याची पत्नी यांनी जुनिअर नटीआर सोबत फोटो काढला. हा फोटो सूर्याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. एक फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'भाऊ, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकल्याबद्दल पुन्हा एकदा आरआरआरचे अभिनंदन.'
अनेक ट्विटर यूजर्सनी भारतीय खेळाडूंसोबत RRR स्टारचे फोटो पोस्ट केले. येथे तुम्ही तेलुगु स्टारचा यजुवेंद्र चहलसोबत पाहू शकता. चहलने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'लोकांच्या नायक @jrntr ला भेटून खरंच खूप आनंद झाला. तो एक चांगला गृहस्थ आहे आणि गोल्डन ग्लोब जिंकल्याबद्दल अभिनंदन. सर्वांना तुझा अभिमान आहे.