कर्जत येथील एका फार्महाउसवर शार्दूल आणि मिताली यांचा शाही लग्न सोहळा पारपडला असून या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत.
शार्दुलने त्याचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या लग्नाची घोषणा केली. तसेच जोडीदार म्हणून नेहमी चांगलया वाईट काळात एकमेकांना साथ देऊ असे सुंदर कॅप्शन या फोटोना दिले आहे.
25 फेब्रुवारी पासून सुरु असलेल्या विवाह कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ यापूर्वी समोर आले आहेत. यात शार्दूल त्याच्या हळदी समारंभात झिंगाट गाण्यावर नृत्य करताना दिसला होता.