भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आपल्या कुटुंबासोबत मदीना येथे पोहोचली आहे. यावेळी सानिया बुरख्यात दिसत असून तिचा हा लूक खूप व्हायरल होत आहे.
सानिया मिर्झा तिचा मुलगा इज़हान मिर्झा मलिक, बहीण अनम आणि आई वडील यांसह कुटुंबातील इतर व्यक्तींसोबत मदीना पोहोचली.
नेहमी स्टायलिश अंदाजात दिसणाऱ्या सानियाचा बुरखा घातलेला नो मेकअप लूक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तर संपूर्ण कुटुंबसोबत असताना शोएब मलिकच्या अनुपस्थितीवर देखील नेटकऱ्यांनी सानियाला कमेंट करून प्रश्न विचारले आहेत.