क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. याच दरम्यान ऋषभ पंतचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहे.
त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याच दरम्यानचे फोटो देखील समोर आले आहेत.
कार अचानक अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कार जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात होता.
सध्या पंतवर देहरादून इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या पाठीला आणि डोक्याला मोठी दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.