दिल्ली कपिटल्सने कोट्यवधी रुपये देऊन पृथ्वी शॉ ला रिटेन केले असून आयपीएलला जवळपास 1 महिना असताना संघाने आयपीएलसाठी सराव सुरु केला आहे.
इंडियन प्रीमियर लीगसाठी दिल्ली कपिटल्सचा प्रॅक्टिस कॅम्प सुरु झाला असून याला पृथ्वीने हजेरी लावली. याचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीमधून शेअर करण्यात आले आहेत.
16 फेब्रुवारी रोजी पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र मुंबईतील एका हॉटेल मध्ये गेले असताना, तरुणांच्या समूहाने हल्ला केला होता. या हल्ल्यात पृथ्वीची गाडी फोडण्यात आली होती. तसेच या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.