28 वर्षीय वेगवान गोलंदाज हसन अली याने 2019 मध्ये भारतीय महिला अभियंता शामिया आरजूसोबत लग्न केले होते. दुबईत यांचा शाही विवाह पारपडला होता.
हसन अलीची पत्नी शामिया आरजू खूप सुंदर असून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा ड्रेस सेन्स फारच अप्रतिम असून ती नेहमीच सोशल मीडियावफोटो शेअर करते.
शामिया आरजू ही हरियाणातील नूह जिल्ह्यातील मेवात येथील रहिवासी आहे. या दोघांची पहिली भेट दुबईत झाली होती. यानंतर हळूहळू दोघांची मैत्री झाली, ज्याचे रुपांतर नंतर प्रेमात झाले.
शामिया आरजूने सांगितले की तिचा आवडता फलंदाज हा भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आहे . ती विराटची खूप मोठी फॅन आहे. तर तिचा आवडता गोलंदाज हा तिचा पती हसन अली आहे.
भारतीय मुलीशी लग्न करणारा हसन अली हा चौथा पाकिस्तानी क्रिकेटर आहे. त्यांच्या आधी झहीर अब्बास, मोहसीन खान आणि शोएब मलिक यांनी भारतीय मुलींशी विवाह केला होता.