यशस्वी जयस्वाल हा केवळ 21 वर्षांचा असून त्याने आयपीएलमध्ये 32 सामने खेळले आहेत. तसेच या सामन्यांमध्ये त्याने 975 धावा केल्या असून त्यात एक शतक ठोकले आहे.
यशस्वीचे वडील रस्त्यांवर पाणीपुरी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे तर यशस्वी देखील आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करायचा. परंतु त्याने क्रिकेट खेळण्यासाठी घेतलेले कष्ट इत्यादींमुळे आज यशस्वी जयस्वाल लाखो रुपये कमावतो.
नॉलेज डॉट कॉम या वेबसाइटनुसार, यशस्वीची एकूण संपत्ती 12 कोटी रुपये आहे. यशस्वी जयस्वाल याचा पगार 4 कोटींहून अधिक तर मासिक उत्पन्न 35 लाखांपेक्षा जास्त आहे, ही कमाई त्याची क्रिकेट आणि जाहिरातीतून होते.
2020 मध्ये, यशस्वीने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी पदार्पण केले. राजस्थानने 2.40 कोटींमध्ये यशस्वीला आपल्या संघात सामील करून घेतले.
राजस्थान रॉयल्सने 2022 मध्ये यशस्वीच्या पगारात वाढ केली. या फ्रँचायझीने या प्रतिभावान खेळाडूला 4 कोटींमध्ये रिटेन केले. यशस्वीने आयपीएलच्या 15 व्या हंगामापर्यंत आयपीएलमधून 8.80 कोटी कमावले होते.
फर्स्ट क्लास क्रिकेट मधून देखील यशस्वी जयस्वालची कमाई तब्बल 20 लाख रुपये आहे. यशस्वी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि विव रिचर्ड्सला त्याचे आदर्श मानतो.