IPL 2023 : यशस्वी जयस्वालच्या शरीरावर आहेत हे खास Tattoo, ज्यामधून त्याला मिळते प्रेरणा
आयपीएल 2023 मधील राजस्थान रॉयल्सचा स्टार युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने काहीच दिवसांपूर्वी केकेआर विरुद्धच्या सामन्यात 13 चेंडूत अर्धशतक करण्याची कामगिरी केली आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला. कठीण परिस्थितीतून क्रिकेट विश्वात नाव कमवत असलेल्या यशस्वीच्या शरीरावर 3 खास टॅटू आहेत, जे त्याला नेहमी प्रेरणा देत असतात.
राजस्थान रॉयल्सचा धाकडं फलंदाज यशस्वी जयस्वाल आयपीएल 2023 मध्ये जबरदस्त कामगिरी करीत आहे. त्याने 13 मॅचमध्ये 575 धावा केल्या असून त्याने आयपीएल कारकिर्दीत एक शतक देखील ठोकले आहे.
2/ 6
यशस्वी जयस्वालचा जन्म उत्तर प्रदेशातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. क्रिकेटमध्ये करिअर करत असताना त्याला पाणीपुरी देखील विकावी लागली, असा बराच संघर्ष करून उत्तम खेळाच्या जोरावर तो नावारूपाला आला.
3/ 6
इतर क्रिकेटर्सप्रमाणे यशस्वी जयस्वाल देखील टॅटू प्रेमी आहे. त्याने आपल्या शरीरावर 3 टॅटू काढले असून हे टॅटू त्याला नेहमी आयुष्यात प्रेरणा देत असतात.
4/ 6
यशस्वी जयस्वालने त्याच्या एका हातावर 'BELIVE 16.10.2019' चा टॅटू काढला आहे. ज्याचा अर्थ असा की, " 16 ऑक्टोबर 2019 रोजी त्याने झारखंडविरुद्धच्या लिस्ट-ए सामन्यात 203 धावा केल्या होत्या.
5/ 6
तर यशस्वीच्या दुसऱ्या हातावर "I Trust 07.05.2022" असा टॅटू आहे. ज्याचा अर्थ असा की, "या दिवशी, त्याने आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 68 धावा केल्या आणि सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला.
6/ 6
यशस्वीने त्याच्या पोटावर देखील एक टॅटू काढला आहे, ज्यात त्याने काही प्रेरणादायी वाक्य लिहिली असल्याचे सांगितले जाते.