30 एप्रिल रोजी आयपीएल 2023 मधील 42 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. योगायोगाने याच दिवशी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याचा वाढदिवस देखील असल्याने तो त्याचा वाढदिवस खास बनवण्याचे प्रयोजन मुंबई इंडियन्सकडून करण्यात आले आहे.
वाढदिवसा सोबतच यंदा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून रोहित शर्माची 10 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा या दहाव्या वर्षाचं आणि रोहितच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन एकत्रितपणे वानखेडेवर केले जाईल.
रोहित शर्माच्या नेतृत्वावातील 10 वर्षांमध्ये मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
वाढदिवसानिमित्त रोहित शर्माने वानखेडे स्टेडीयमवर एक फोटो शूट केले असून सध्या हे फोटोस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबई इंडियन्सने वानखेडेवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळवण्यात येणारा सामना रोहित शर्माला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्माने आयपीएलमधील त्याच्या कारकिर्दीची सुरुवात डेक्कन चार्जर्स या संघातून केली होती. परंतु 2011 रोजी त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले.