IPL 2023 : सहाव्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सने कसली कंबर, वानखेडेवर सुरु केला सराव
आयपीएलच्या 16 व्या सीजनला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. यंदा आयपीएलची ट्रॉफी पटकवण्यासाठी 10 संघ क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांशी भिडणार आहेत. अशातच तब्बल 2 वर्षांनी मुंबई इंडियन्स संघाने वानखेडे स्टेडियमवर सरावाला सुरुवात केली आहे. यावेळी मुंबईचे स्टार खेळाडू कसून सरावाला लागले असून मैदानात घाम गाळताना दिसत आहेत.
कोरोना महामारीनंतर यंदा तब्बल 2 वर्षांनी आयपीएल संघांच्या होम ग्राउंडवर सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ देखील तयारीला लागला असून शनिवार पासून मुंबई संघाने सरावाला सुरुवात केली आहे.
2/ 5
मुंबई इंडियन्सचा संघ त्यांचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर परतली असून स्टार खेळाडूंनी मुंबईचा कॅम्प जॉईंट केला आहे.
3/ 5
टिम वॉर्नर, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, किरॉन पोलार्ड इत्यादी अनेक खेळाडू वानखेडेवर सराव करताना दिसत आहेत.
4/ 5
मुंबई इंडियन्सने खेळाडूंचे सरावा दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत.
5/ 5
8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.