1. एमएस धोनी : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक कमाई केलेली आहे. धोनीने गेल्या वर्षीपर्यंत (2022) आयपीएलमधून 164 कोटी 84 लाख रुपये कमावले आहेत. 2018 ते 2012 या कालावधीत त्याने वार्षिक 15 कोटी रुपये घेतले होते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याने आपलं शुल्क कमी करून 12 कोटी रुपये केलं आहे. त्याच्या मागील वर्षाच्या मानधनाचाही समावेश केला तर धोनीची आयपीएलची एकूण कमाई 176 कोटी 84 लाख रुपये होईल.
2. रोहित शर्मा : एकूण कमाईच्या बाबतीत रोहित शर्माने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई टीमला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. रोहितने गेल्या दीड दशकात आयपीएलमधून 162 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पुरस्कार आणि जाहिरातींमधून मिळणारं उत्पन्न वगळून ही कमाई आहे. 2022मध्ये रोहितने वार्षिक मानधनातून 16 कोटी रुपये मिळवले आहेत.
3. विराट कोहली : विराट कोहली 2008 साली झालेल्या पहिल्या आयपीएल सीझनपासून सातत्याने ही क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या वर्षापासून कोहलीची कामगिरी आणि कमाई वाढत गेली आहे. गेल्या सीझनपर्यंत कोहलीनं आयपीएलमधून 150 कोटी 20 लाख रुपये कमावले आहेत. 2018 ते 2021 या वर्षांत कोहलीने आरसीबीकडून वार्षिक 17 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. गेल्या वर्षी त्याला 15 कोटी रुपये मानधन मिळालं होतं.
4. सुरेश रैना : चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू सुरेश रैनाचा आयपीएलशी दीर्घ काळ संबंध आहे. रैना 2022मध्ये ही स्पर्धा खेळला नव्हता. त्याने स्वतःची नोंदणी केली होती; पण कोणत्याही टीमने त्याच्यावर बोली लावली नाही. 2008पासून ही स्पर्धा खेळणाऱ्या रैनाने या स्पर्धेतून 100 कोटी आणि 74 लाख रुपये कमावले आहेत. त्याचं शेवटचं वार्षिक मानधन 11 कोटी रुपये होतं.
5. एबी डिव्हिलियर्स : दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार खेळाडू असलेल्या एबी डिव्हिलियर्सनं आयपीएलला एक वेगळा आयाम दिला. त्याच्या अष्टपैलू फटकेबाजीमुळे त्याला मिस्टर 360 डिग्री म्हटलं जातं. एबीने गेल्या हंगामापर्यंत आयपीएलमध्ये 100 कोटी 51 लाख आणि 65 हजार रुपये कमावले आहेत. ही रक्कम त्याला फ्रँचायझीकडून मानधन म्हणून मिळाली आहे. त्यात जाहिरात आणि इतर बक्षीस रकमेचा समावेश नाही. डिव्हिलियर्स 2021मध्ये आयपीएलचा (आरसीबी) शेवटचा सीझन खेळला. त्याचं शेवटचं वार्षिक मानधन 11 कोटी रुपये होतं.