हैद्राबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात आयपीएल 2023 मधील 25 वा सामना पारपडला.
या सामन्यात सनरायजर्स हैद्राबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यामुळे मुंबई संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले.
आयपीएल 2023 मधील 25 व्या सामन्यात रोहित शर्माने 18 बॉलमध्ये 28 धावांची खेळी केली. यासह त्याने आयपीएलमध्ये 6 हजार धावा करण्याचा टप्पा ओलांडला.
यापूर्वी विराट कोहलीने 188 सामन्यांमध्ये 6 हजार धावा केल्या होत्या. तर डेव्हिड वॉर्नरने केवळ 165 सामन्यात 6 हजार धावांचा टप्पा ओलांडत आयपीएलमध्ये सर्वात जलद 6 हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाला तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.