आरसीबीचा फलंदाज आणि विकेटकिपर असलेल्या दिनेश कार्तिकची आयपीएल 2023 मध्ये घसरण सुरूच आहे. रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध केलेल्या खराब फलंदाजीमुळे त्याने हिटमॅन रोहित शर्माच्या आयपीएलमधील एका नकोशा विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
आयपीएल 2023 मध्ये 60 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात पारपडला. या सामन्यात आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 171 धावा करून 5 विकेट्स गमावल्या.
2/ 7
आरसीबी संघाला मोठ्या धावसंख्येचे आव्हान देण्यासाठी फलंदाजांकडून अधिक धावा करण्याची अपेक्षा असताना दिनेश कार्तिक मात्र पुन्हा एकदा संघाच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही.
3/ 7
आरसीबी संघाला मोठ्या धावसंख्येचे आव्हान देण्यासाठी फलंदाजांकडून अधिक धावा करण्याची अपेक्षा असताना दिनेश कार्तिक मात्र पुन्हा एकदा संघाच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही.
4/ 7
दिनेश कार्तिक राजस्थानचा गोलंदाज झाम्पाने टाकलेल्या चेंडूवर बाद झाला. तो 2 चेंडूत शुन्य धावा करून पुन्हा एकदा डक आऊट झाला.
5/ 7
दिनेश कार्तिकच्या आयपीएल कारकिर्दीत हा 16 डक आउट ठरला आणि यासह त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
6/ 7
आयपीएलच्या इतिहासात तब्बल 16 वेळा डक आउट होण्याचा नकोसा विक्रम यापूर्वी केवळ रोहित शर्माच्या नावावर होता. परंतु आता दिनेश कार्तिक,च्या नावावर देखील या विक्रमाची नोंद झाली आहे.
7/ 7
आयपीएल 2023 मध्ये फलंदाजीत दिनेश कार्तिकचे प्रदर्शन फार चांगले राहिलेले नाही. त्याने आतपर्यंत 12 सामन्यात केवळ 140 धावा केलेय आहेत. तर यात त्याची सर्वोत्कृष्ट धाव संख्या ही 30 आहे.