अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023 चा अंतिम सामना पारपडला.
चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यात झालेल्या रोमांचक लढतीत शेवटच्या बॉलवर चौकार ठोकून रवींद्र जडेजाने चेन्नईला ही मॅच जिंकवून दिली.
एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलं असून यासह त्यांनी मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.