कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने 841.50 गुण मिळवले असून यात त्याचा प्रथम क्रमांक आला. सोनूच्या विजयानंतर क्सत्याच्या घरातील सदस्य खूप आनंदित झाले आहेत.
सोनू सामंतने Dream 11 वर सोनूसम डेल्टास उर्फ भरत सिंह या नावाने आयडी बनवला होता. सोनू हा भारतीय सैन्यात सेवा देत असून सप्टेंबर 2020 पासून तो Dream 11 सारख्या फॅन्टसी लीगमध्ये सहभाग घेत आहे.
सोनू म्हणाला, " मी Dream 11 मधून 2 कोटी रुपये जिंकले यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही, मी केवळ छंद म्हणून हा खेळ खेळत होतो".
काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या कैलाश रावत यांना ही 1 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. त्यांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात Dream 11 टीम लावली होती.
कैलाश रावत हे देखील पोलीस कॉन्स्टेबल असून त्यांनी मागच्याच आठवड्यात 1 कोटींची धनराशी जिंकली. ड्रीम 11 वरील जिंकलेल्या पैशांमधून कुटुंबासाठी घर बांधणार अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
कैलाश रावत हे 2020 पासून ड्रीम 11 वर फँटसी क्रिकेट खेळत होते. परंतु या दरम्यान एकदाही त्यांना यश मिळाले नाही. परंतु अखेर यावर्षी ड्रीम 11 मुळे तब्बल 1 कोटीची लॉट्री लागल्यामुळे त्यांचे कुटुंब देखील आनंदी आहे.
Dream 11 हा ॲानलाईन गेमिंगचा प्रकार आहे. या खेळामुळे सवय लागू शकते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी. व्हायरल झालेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.