आज मुंबई इंडियन्स संघाची पहिली पत्रकार परिषद मुंबई येथे पारपडली. यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर हे उपस्थित होते.
पत्रकारांनी ,यावेळी अर्जुन तेंडुलकरला प्लेईंग 11 मध्ये घेण्याबाबत रोहितला विचारणा केली. तेव्हा रोहित आणि मार्क बाऊचर यांनी अर्जुनबाबत मोठे वक्तव्य केले.
प्रशिक्षकाने सांगितले की मुंबई संघाच्या व्यवस्थापनाची नजर अर्जुनवर आहेत आणि त्याला यावर्षी प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते.
अर्जुन तेंडुलकर हा 2021 पासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे, परंतु पहिल्या वर्षी पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. तर 2022 मध्ये तो स्वस्थ असताना देखील त्याला एकाही सामन्यात प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा भाग होऊनही अर्जुन आयपीएलमध्ये पदार्पण करू शकला नाही.
रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला, अर्जुन तेंडुलकरने मागील काही सामन्यांमध्ये चांगले क्रिकेट खेळले आहे. त्याला दुखापत झाली होती, मात्र आज तो गोलंदाजीला सुरुवात करणार आहे. तसेच मार्क बाउचर म्हणाले, अर्जुन सध्या चांगली गोलंदाजी करत आहे. आम्हाला वाटते की तो या वर्षी प्लेईंग 11 मध्ये असेल.