मुंबई इंडियन्सचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2023 मधील 22 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यातून 23 वर्षांचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकर याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे.
अर्जुन तेंडुलकर हा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असून त्याला तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने अर्जुनला त्याच्या संघाची कॅप देऊन त्याचे अभिनंदन केले. मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात अर्जुन तेंडुलकरने सामन्याची पहिली ओव्हर टाकली.
अर्जुनने आयपीएल 2023 मध्ये टाकलेल्या पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5 धावा दिल्या. यावेळी स्टेडीयमवर बहीण सारा तेंडुलकर अर्जुनला चिअर करताना दिसली.
अर्जुनच्या बॉलिंगवेळी सर्वांचे लक्ष सारा तेंडुलकरने वेधून घेतले. ती यावेळी मैदानात मुंबई इंडियन्सची जर्सी घालून चिअर करताना दिसली.