16 एप्रिल 2023 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामन्यातून अर्जुन तेंडुलकरचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले. मुंबई इंडियन्सचा भाग झाल्यानंतर तब्बल 2 वर्षांनी अर्जुनला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.
अर्जुनचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमधून झाले असून या शाळेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं देखील शिकतात.
10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अर्जुनने त्याचे उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 करता 30 लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये रिटेन केलं आहे.