
आयपीएलच्या बाराव्या हंगामात विदेशी खेळाडूंची जास्त चर्चा होती. त्यात वेस्ट इंडिजचे खेळाडू सर्वत क्षेत्रात उत्तम ठरले. यात वेस्ट इंडिजचा युवा गोलंदाज अलझारी जोसेफ आपल्या पहिल्याच सामन्यात चर्चेचा विषय बनला. हैदराबाद विरोधात आपल्या पदार्पणातच 12 धावा देत 6 विकेट घेण्याचा विक्रम केला होता.

जोसेफच्या या फॉर्मच्या जोरावर मुंबईनं अनेक सामने जिंकले, मात्र एका सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना, त्याला दुखापत झाली आणि त्याला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली. त्यामुळं त्याला आता वर्ल्ड कप खेळता येणार नाही.

मुंबई इंडियन्सकडून खेळताना जोसेफनं राजस्थान रॉयल्स विरोधात 3 ओव्हरमध्ये तब्बल 50 धावा दिल्या होत्या. त्यावेळी क्षेत्ररक्षण करताना त्याला गंभीर दुखापत झाली होती.

मात्र आता, मुंबई इंडियन्स त्याच्या मदतीला धावून आली आहे. मुंबई संघानं त्याच्या फिटनेस आणि वैद्यकीय खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. मुंबई के एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने त्याच्यावर उपचार केले जाणार आहे. या उपचाराचा खर्च मुंबई इंडियन्स संघ उचलणार आहे.

दरम्यान त्याची दुखापत गंभीर असून त्याला बरं होण्यासाठी 5-6 महिने लागणार आहे. त्यामुळं पहिल्या विश्वचषकाची त्याची संधी हुकली आहे.




