भारत आणि बांगलादेश दरम्यान तिसरी T20 मॅच 10 नोव्हेंबरला नागपूरात होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ नागपूरात आहे.
शनिवारचा दिवस हा भारतीय संघासाठी खास होता. कारण त्यांनी हवाई दलात अद्भूत करिष्मा दाखविणाऱ्या जवानांची भेट घेतली.
तर हवाई दलाच्या शूर जवानांनाही लाडक्या खेळाडूंना भेटून नवं स्पिरिट मिळालं. या जवानांनीही खेळाडूंना काही टिप्सही दिल्यात
हवाई दलाचं सूर्य किरण हे पथक सध्या नागपूरात असून ते 10 तारखेला आकाशात आपल्या विमानांनी रंगांचा करिष्मा दाखविणार आहे.