

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघात यंदाच्य विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दरम्यान भारतीय संघासाठी निळ्या रंगाची जर्सी नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. मात्र, सुत्रांनुसार आयसीसीच्या नवीन नियमांमुळं भारतीय संघ भगव्या रंगाच्या जर्सीच यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दिसू शकतो.


IANS या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार 2019च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या जर्सीचा रंग का भगवा असू शकतो. याचे कारण म्हणजे, अफागाणिस्तान आणि भारत यांच्या जर्सीचा रंग सारखा असल्यामुळं भारताला भगव्या रंगाची जर्सी परिधानकरुन खेळावे लागणार आहे. दरम्यान या जर्सीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


या जर्सीचा एक फोटो व्हायरल होत असला तरी, समोरुन जर्सी कशी असणार आहे याचा फोटो अद्याप आलेला नाही. दरम्यान बीसीसीआय किंवा आयसीसीच्या वतीने या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. तायमुळं भारतीय संघ नक्की कोणत्या जर्सीत दिसणार हे गुपित कायम आहे.


आयसीसीनं फुटबॉलप्रमाणे आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. भारत, अफागाणिस्तान यांच्या जर्सीचा रंग निळा तर, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या जर्सीचा रंग हिरवा असल्यामुळं या संघानं रंग बदलण्यास सांगण्यात आले होते.