क्रिकेटमध्ये वन-डे , टी-२० आणि टेस्ट अशा तीन सामन्यांचा समावेश आहे. यापैकी टेस्ट मॅचेस या ५ दिवसांच्या असतात तर वनडे आणि टी २० मॅचेस या एका दिवसाच्या असतात.
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या बॉलचा वापर केला जातो. यात पांढरा, लाल, गुलाबी या रंगांच्या बॉलचा समावेश असतो.
आयसीसीच्या बहुतांश सामन्यांमध्ये कुकाबुरा कंपनीचे बॉल वापरले जातात. कुकाबुरा ही ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्सवेअर कंपनी आहे. कुकाबुरा कंपनीचे बॉल भारतातील मेरठ आणि जालंधर इत्यादी ठिकाणी उपलब्ध आहेत.
टेस्ट क्रिकेट सामन्यांमध्ये कूकाबुरा कंपनीचे बॉल वापरले जातात. ज्याची किंमत ही सुमारे 8 हजार इतकी असते. तर SG कंपनीच्या बॉलची किंमत ही ५ हजार रुपयांपर्यंत असते. या चेंडूने फक्त 80 षटके टाकता येतात.
वनडे आणि टी-20 सामन्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉलची किंमत ही 12 हजार पर्यंत असते. तर एसजी कंपनीच्या बॉलची किंमत ही 4 हजार इतकी असते. तसेच हे बॉल वॉटर रेझिस्टंट असून त्यामध्ये पाणी प्रवेश करू शकत नाही. हे सर्व बॉल चामड्यापासून बनवले जातात.
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या बॉलचा वापर केला जातो. यात पांढरा, लाल, गुलाबी या रंगांच्या बॉलचा समावेश असतो.