भारताचा स्टार फलंदाज आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्याच्यावर लंडन येथे शस्त्रक्रिया केली जाणार अशी माहिती असून यामुळे तो पुढील तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.
भारताचा गोलंदाज युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. यात ती एका इफ्तार पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत सेल्फी घेत होती. या सेल्फीत पार्टीत उपस्थित असलेला श्रेयस अय्यर देखील दिसला. यामुळे धनश्री आणि श्रेयस अय्यरच्या संबंधांवर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.
अनेकांनी युजवेंद्र चहल याला श्रेयस आणि धनश्री यांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. तर काहींनी श्रेयस अय्यर दुखापतीच कारण देऊन पार्टी करीत असल्याचे म्हंटले.
यापूर्वी देखील मराठमोळा क्रिकेटर शार्दूल ठाकूर याच्या लग्नात धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर सोबत दिसल्याने ट्रॉलर्सनी या दोघांची तुलना दिनेश कार्तिकची पूर्व पत्नी निकिता आणि माजी क्रिकेटर मुरली विजय यांच्याशी केली होती.
युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही एक डान्सर आणि डेंटिस्ट असून या दोघांचे लग्न 2020 मध्ये झाले होते. धनश्री सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून ती तिचे डान्सचे व्हिडिओ आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.