कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं शेवटच्या ओव्हरमध्ये मास्टरस्ट्रोक खेळत जोगिंदर शर्माच्या हातामध्ये बॉल दिला. मिसाबहनं जोगिंदरच्या दुसऱ्या बॉलवर सिक्स लगावला. पण त्यानंतर पुढच्या बॉलवर आणखी एक सिक्स लगावण्याच्या प्रयत्नात तो श्रीसंतकडं कॅच देऊन आऊट झाला. त्यामुळे भारतीय टीमनं टी20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं. आता यूएईमध्ये पुढील महिन्यात टी20 वर्ल्ड कप होणार (T20 World Cup 2021) आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनीच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीच्या टीमला पुन्हा एकदा इतिहास रचण्याची संधी आहे. (फोटो – Twitter/Gautam Gambhir)