IND vs SA : वामिकानं केलं विराटला चिअर, अनुष्काच्या मांडीवर बसून पाहिला ऐतिहासिक विजय! Photos
India vs South Africa: टीम इंडियानं सेंच्युरियन टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. विराटची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिका (Vamika) या देखील ऐतिहासिक विजयाच्या साक्षिदार होत्या.
मुंबई, 31 डिसेंबर: विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं सेंच्युरियन टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. विराटची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिका (Vamika) या देखील ऐतिहासिक विजयाच्या साक्षिदार होत्या.
2/ 6
टीम इंडियानं सेंच्युरियन टेस्टमध्ये पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. या टेस्टच्या शेवटच्या दिवशी विराटला चिअर करण्यासाठी अनुष्का शर्मा मुलगी वामिकासह स्टेडियममध्ये उपस्थित होती.
3/ 6
वामिकानं तिचे बाबा विराट कोहलीला मॅचच्या दरम्यान चिअर केले. वामिकाचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
4/ 6
सोशल मीडियावर वामिकाच्या फोटोवर हार्टचा इमोजी लावून तो व्हायरल होत आहे. विराट आणि अनुष्कानं त्यांच्या मुलीचा चेहरा जगाला न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे वामिकाचा फोटो या पद्धतीनं व्हायरल होत आहे.
5/ 6
विराट आणि अनुष्का यांनी यापूर्वीही अनेकदा वामिकाचा चेहरा सर्वांपासून लपवला आहे. त्याचबरोबर वामिकाचा फोटो न काढण्याचं आवाहन केले आहे. (Instagram)
6/ 6
अनुष्का शर्मानं काही दिवसांपूर्वी वामिकाचा फोटो शेअर न केल्याबद्दल मीडियाचे आभार मानले होते. (Anushka Sharma/Instagram)